August 19, 2025
black ink on st

कर्नाटकच्या बसला दौंड येथे काळे फासल्यावर आता कर्नाटकात देखील त्याचे पडसाद उमटले असून कलबुर्गी येथे महाराष्ट्राच्या बसला काळी शाई लावण्यात आली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची अक्कलकोट अफझलपुर बस थांबवून बसला काळी शाई फसली.बसवर बेळगाव आमचेच,अक्कलकोट, जत आमचेच,महाराष्ट्राचा धिक्कार असो असे लिहिलेली पोस्टर बसवर लावली.
लाल पिवळा झेंडा हाती घेतलेल्या एका कार्यकर्त्याने बसवर चढून घोषणाबाजी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत कर्नाटकचे असे वक्तव्य केल्यानंतर सीमाप्रश्नावरून कर्नाटक महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. ब्यूरो रिपोर्ट बेळगाव एक्स्प्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *