
बेळगाव येथील एपीएमसी मार्केट यार्ड येथील श्री वीरशैव दुरदुंडेश्वरा मठाचा जत्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
प्रारंभी आज सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक, आणि त्यानंतर भगवान श्री दुरदुंडेश्वराची विशेष पूजा करण्यात आली.
तसेच होम हवन, महामंगलार्थि करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून देवाचे दर्शन घेतले, याप्रसंगी कर्नाटक डिफेन्स फोरमचे उत्तरकर्नाटक राज्य अध्यक्ष महांतेश रंगट्टीमठ यांनी जत्रा महोत्सवा विषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जत्रा महोत्सवा निमित्त होम, हवन, महापूजा, महाप्रसाद व सायंकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी दुरदुंडेश्वर जत्रा महोत्सवात हजारो लोकांनी सहभागी होऊन देवाचे दर्शन घेतले व महाप्रसादचा लाभ घेतला. ब्यूरो रिपोर्ट बेळगाव एक्स्प्रेस