August 19, 2025
request ot police comissioner

गेल्या दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर परिसरात शुल्लक कारणार वरून आशिष शेणवी या युवकाला धक्काबुक्की करून जबर मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर दगडाने हल्ला करून जखमी करण्यात आले होते. त्यामुळे आशिष शेणवी वर शिल्लक कारणावरून हल्ला करणाऱ्यांना अटक करून शिक्षा द्यावी अशी मागणी आशिष च्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्त डॉक्टर एमबी बोरलिंगय्या यांच्याकडे निवेदना द्वारे केली.

यावेळी आशिष च्या कुटुंबियांनी भाग्य नगर परिसरात मंगळवारी झालेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांना दिली, तसेच आमच्या मुलाला जबर मारहाण केलेल्या युवकांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी शेणवी कुटुंबियांनी याप्रसंगी केली.

कुटुंबियांनी या प्रकरणाचा नीट तपास करून आरोपांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी जेणेकरून परिसरात होणाऱ्या अशा प्रकारांच्या दादागिरी ला आळा बसेल आणि त्यांना देखील चांगलीच अद्दल घडेल असे यावेळी पोलीस आयुक्तांना सांगितले. याप्रसंगी शेणवी कुटुंबियांनी सह त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. ब्यूरो रिपोर्ट बेळगाव एक्स्प्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *