August 19, 2025
khanpur protest against maharashtra governor

शिवाजी महाराजां विरोधातील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने खानापूर तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे पुतळे जाळले व त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांमार्फत अध्यक्षांना केली.
यावेळी बोलताना खानापूर काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी ऐतिहासिक पुरुषांबद्दल अपमानास्पद बोलले, उच्च पदावर असलेल्या या दोन व्यक्तींनी आजच्या पिढीसाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजीं महाराज बद्दल असे वक्त्यव्य करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सर्कलच्या मधोमध काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला असता पोलीस कर्मचार्‍यांनी वाहतुकीला अडथळा होत असल्याचे पाहून पोलिसांनी जाळलेल्या प्रतिकृतीचे अवशेष साफ केले आणि सदर मार्ग मोकळा करून वाहतुकीस परवानगी दिली. ब्यूरो रिपोर्ट बेळगाव एक्स्प्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *