दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित चित्रकला व हस्तकला स्पर्धा शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे अतिशय उत्साहारी वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे श्री बाळू बस्ती यांनी आपल्या मनोगत आतून कौतुक केले सरकारी दरबारी सुद्धा अशा स्पर्धा भरवता येत नाहीत पण या संस्थेमार्फत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कलागुणांचे सादरीकरण केलं जातं असे मत त्यांनी व्यक्त केले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री एस डी पाटील सर बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी दक्षिण मराठी शिक्षण मंडळ प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच विविध उपक्रम प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये राबविले जातात विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासच्या दृष्टिकोनातून आपली संस्था नेहमीच कार्यतत्पर असते आणि त्यासाठीच इथे प्रत्येक शिक्षक ही त्याच तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असतो. यावेळी आयोजित बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मारुती सखाराम साबळे निवृत्त मुख्याध्यापक हे होते त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील मंडळाची संचालक व संभाजी हायस्कूल बैलूर चे श्री एस डी पाटील सर, मुख्याध्यापक पी आर पाटील, प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक पी जी गुरव सर, शाळा सुधारणा मंडळाचे सभासद श्री संजय राऊत, हनमंत जगताप हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जीडीपीआय बेळगावचे चित्रकला अधिकारी श्री बाळू गस्ती यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर श्री रवी पी बडीगिर व श्री नागेश मारुती पाटील यांचे योगदान लाभले. या स्पर्धेमध्ये संस्थेतील जवळजवळ 35 शाळांनी सहभाग नोंदविला महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून संस्थेच्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सी एस कदम सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री ए जे सावंत सर व आभार श्री एस आय काकतकर यांनी मांडले