बेळगाव:सध्या महागाई वाढत चालली आहे त्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच दिव्यांगाना आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे त्यामुळे शारीरिक दृष्ट्या 75 टक्के आणि शंभर टक्के दिव्यांग असलेल्ल्या व्यक्तींनी सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पेन्शन रक्कमेत वाढ करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
यावेळी दिव्यांगांनी आपल्याला देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये तीन ते पाच हजार रुपये अशी सरकार तर्फे पेन्शन देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून आपल्या मागणीचे निवेदन सादर केले
यावेळी दिव्यांग असलेल्या व्यक्तींनी आपल्या समस्याचे गाराने यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडले यावेळी दिव्यांग व्यक्ती म्हणाल्या की जीवनावश्यक वस्तूंची दर वाढ बेरोजगारी यामध्ये आमचा निभाव लागणे कठीण बनले आहे.यासह आम्हाला देण्यात येणारी पेन्शन ही तुटपुंजी आहे
या पेन्शनमध्ये आम्हाला आमचे घर चालविणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे सरकारने आमचा विचार करून आम्हाला देण्यात येणाऱ्या पेन्शन रक्कमेत वाढ करावी अशी मागणी केली यावेळी महादेवी कित्तूर उमेश रट्टी नेमिनाथ बस्तवाड अब्दुल रहमान न बानू सुतकट्टी शकीला यांच्यासह अन्य दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते.