August 19, 2025
benake

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी शहरात अनेक विकास कामांचा शुभारंभ करून मतदारसंघातील जनतेची वाहवाह मिळवली आहे. आज आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत बर्निंग स्टँड, पेव्हर बसण्याच्या कामाचे भूमिपूजन करून उदघाट्न केले .
यावेळी त्यानी सदाशिव नगरच्या लिंगायत रुद्र भूमीत पेव्हर, शौचालय आणि शेड टाकण्याचे काम सुरू केले. तसेच न्यू गांधी नगर, अमन नगर, मारुती नगर, बसवन कुडची येथील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर रस्ता, गटार, ड्रेनेज कालव्याच्या कामांचा शुभारंभ केला.
यावेळी बेळगाव एक्सप्रेसशी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले, आज मतदारसंघात अनेक कामांचा शुभारंभ झाला आहे. एकूण 5 कोटींहून अधिक खर्चाच्या या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. या भागात अनेक समस्या असून येत्या काळात त्या सोडविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी न्यू गांधीनगर मध्ये समाजसेवक नजीर अहमद पटवेगर, ऐजाज हकीम, समीर मिर्झा, भाजप युवा नेते निखिल मुरकुटे, मानव हक्क अधिकार जिल्हाध्यक्ष सुधीर संभाजी, स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *